Home संगमनेर संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर डोळसणे शिवारात गोमांसणे भरलेला पिकअप पलटी  

संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर डोळसणे शिवारात गोमांसणे भरलेला पिकअप पलटी  

Sangamner Pick up a beef-filled pickup in Dolasane area     

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर डोळसणे शिवारात संगमनेरकडून पुणेच्या दिशेने जात असणाऱ्या टेम्पोने एका मालट्रकला धडक देत पिक अप टेम्पो पलटी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी पिक अप टेम्पो चालक मात्र गाडी सोडून फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास संगमनेरकडून पुणेच्या दिशेने जात असणाऱ्या डोळसणे शिवारात पिकअप (क्रमांक एम.एच.४७. ई २७६०) वाहनाने पुण्याकडे जात असणारा मालट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पिक अप गाडी जागीच पलटी झाली. पिक अप पलटी झाल्याने गाडीमधील गोमांश हे रस्त्यावर अवतरले. हे शेकडो किलो असणारे गोमांश रस्त्यावर पडल्याने पिक चालक तेथून फरार झाला. या अपघातातील ट्रक चालकाने पोलिसांना माहिती कळविली. या अपघाताने महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच डोळसणे महामार्गाचे उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. घारगाव पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी पिक अप ताब्यात घेतला आहे. पिकअपमधील गोमांस हे कोठून आणण्यात आले हे पिक अप चालक पसार झाल्याने अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी घारगाव पोलीस अधिक तपास करीत आहे.  

Web Title: Sangamner Pick up a beef-filled pickup in Dolasane area     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here