संगमनेर तालुक्यात आज रविवारी २४ करोनाबाधित
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात आज रविवारी २४ करोनाबाधित आढळून आले आहेत. शासकीय, खासगी व रॅपिड अॅटीजन चे २४ करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.
शासकीय अहवालानुसार शहरातील संजय गांधीनगर येथे ५५ वर्षीय व्यक्ती, कोल्हेवाडी रोड येथे ३० वर्षीय तरुण, तालुक्यातील घुलेवाडी येथे ४२ वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे २१ वर्षीय तरुण, घारगाव येथे ५ वर्षीय बालिका करोनाबाधित आढळून आली आहे.
खासगी अहवालानुसार शहरातील विद्यानगर परिसरातील ४० वर्षीय महिला, १६ व १७ वर्षाचे दोन मुले, ताजणे मळा येथे ४१ वर्षीय व्यक्ती, सुकेवाडी येथील ५७ वर्षीय महिला, निमगाव पागा येथील ३३ वर्षीय तरुण, कसारा दुमाला येथे ७१ वर्षीय व्यक्तीला करोनाचो लागण झाली आहे.
रॅपिड अॅटीजन अहवालानुसार शहरातील संजय गांधीनगर येथे २० वर्षीय महिला, ८ वर्षीय बालिका, नेहरू चौक येथे ६६ वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथील ६५ वर्षीय महिला, घुलेवाडी ७० वर्षीय पुरुष, २९ वर्षीय महिला, २४ व २० वर्षीय महिला, बोटा येथील ३४ वर्षीय पुरुष, खराडी येथे ७० वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, ११ वर्षीय मुलाला करोनाची लागण झाली असे आज एकूण २४ बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ८०३ इतकी झाली आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Sangamner taluka Today 24 corona infected