Home संगमनेर संगमनेर: दुचाकीच्या डिक्कीतून लांबविले दीड लाख रुपये

संगमनेर: दुचाकीच्या डिक्कीतून लांबविले दीड लाख रुपये

Sangamner theft the trunk of a two-wheeler

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातील अकोले रोड येथे विजय दत्तात्रय सांगळे यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल दीड लाख रुपये लंपास केल्याची घटना बुधवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विजय सांगळे हे संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी याठिकाणी  राहतात. ते किराणा मालाचे व्यावसायिक आहेत. बुधवारी दुपारी ते आपले दुचाकी वरून संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानाजवळ असलेल्या कोटक महिंद्रा बँक जवळ येऊन त्यांनी आपल्या खात्यातून १ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम काढली व सर्व रक्कम त्यांनी गाडीच्या डिक्कीत ठेवली. त्यानंतर ते अकोले रोड येथील गलांडे प्लंबिंग या दुकानामध्ये काम असल्याने गेल्याने त्याचवेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने सांगळे यांच्या दुचाकीतील डिक्की तोडून त्यातील रक्कम लंपास केली. सांगळे हे दुकानातून आले असता तत्यांना डिकी उघडी दिसली. त्यात त्यांना पैसे दिसले नाही ते घाबरून गेले. पैसे चोरी गेले असल्याचे लक्षात आले.

याप्रकणी विजय सांगळे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner theft the trunk of a two-wheeler

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here