Home संगमनेर संगमनेर ब्रेकिंग: वादळात भिंत अंगावर पडून तीन जण ठार तर दोन...

संगमनेर ब्रेकिंग: वादळात भिंत अंगावर पडून तीन जण ठार तर दोन जखमी

Sangamner Three people were killed and two others were injured when a wall collapsed 
Sangamner | संगमनेर तालुका प्रतिनिधी: गणेश भोसले:  संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर गावा अंतर्गत असणार्या  मुंजेवाडी शिवारात वादळी वाऱ्यात भिंत अंगावर पडून तीन जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी  दिनांक ९ जुन रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंजेवाडी शिवारात विठ्ठल भिमाजी दुधवडे हे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. तर गुरवारी दुपारी अचानक जोरदार वादळी वारे सुटले व गारांचा पाऊसही पडु लागला त्यामुळे दुधवडे हे कुटुंबासोबत घरात बसले होते.
परंतु अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने दुधवडे यांच्या घरावरील पत्रे उडून लांबवर जाऊन पडले तर त्याच दरम्यान घराच्या भिंतीही पडल्या या भिंती अंगावर पडल्याने विठ्ठल भिमाजी दुधवडे (वय ७५),हौसाबाई भिमाजी दुधवडे (वय ६७)साहील पिना दुधवडे (वय १०) हे जागेवरच मयत झाले.तर वनिता पिना दुधवडे ( वय ८),मंदाबाई विठ्ठल दुधवडे (वय७०) हे जखमी झाले आहेत.
घटनेची माहीती समजताच महसूल मंडल अधिकारी इराप्पा काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल आदिनाथ गांधले ,पोलीस नाईक संतोष खैरे, गणेश लोंढे,प्रशांत आभाळे यांसह मनसेचे किशोर डोके, शिवसेनेचे जनार्दन आहेर,पोलीस पाटील सीताराम आभाळे, सरपंच अरुण वाघ,संतोष देवकर, संपत आभाळे, अशोक वाघ यांसह आजुबाजुच्या नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना सरकारी रुग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मृतांना खासगी रुगणवाहीकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले. या हृदयद्रावक घटनेने पठार भागातून हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Sangamner Three people were killed and two others were injured when a wall collapsed 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here