Home अकोले छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांना आत्मसात केलं तर तुम्ही देखील यशस्वी व्हाल: प्राचार्य...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांना आत्मसात केलं तर तुम्ही देखील यशस्वी व्हाल: प्राचार्य एम. डी. लेंडे

Shiv Jayanti 2022 Svm Rajur Akole

Rajur | राजूर | Shiv Jayanti 2022: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. देशभरातून शिवरायांना वंदन केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवर्य रा, वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर येथे सर्व पदाधिकारी शिक्षक यांनी त्यांना नमन करत शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम साजरा केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे अतुलनीय नेतृत्व आणि समाजकल्याणासाठी केलेलं कार्य पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत आहे. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायला हवेत आणि ते समजण्यासाठी महाराजांचा इतिहास समजून तो आपल्या जीवनाशी जुळवून घेता आला पाहिजे त्यातूनच तुम्ही आयुष्याची लढाई लढण्यासाठी सिद्ध होऊ शकतात. त्यांच्या गुणांना तुम्ही आत्मसात केलं तर तुम्ही देखील यशस्वी व्हाल अशा शब्दात विद्यालयाचे प्राचार्य एम. डी. लेंडे यांनी उपस्थितांना प्रेरणा दिली. या कार्यक्रमप्रसंगी प्रा. शरद तूपविहीरे व प्रा. संतराम बारावकर यांनी छत्रपती महाराजांविषयी मनोगत व्यक्त केली.

या कार्यक्रमप्रसंगी सत्यानिकेतन संस्था संचालक विजय पवार, प्राचार्य एम.डी. लेंडे, विद्यालय पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन विभागप्रमुख प्रा. बी.एस. घिगे यांनी केले. अध्यक्षीय सुचना गिरी एस. आर यांनी मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. व्ही. घाणे यांनी केले. सूत्रसंचालन आर.डी. साबळे यांनी केले तर आभार एम. एस. दिंडे यांनी आभार मानले.

Web Title: Shiv Jayanti 2022 Svm Rajur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here