Home अहमदनगर नगर जिल्ह्यातील दुकानेही सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत खुले राहणार

नगर जिल्ह्यातील दुकानेही सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत खुले राहणार

Shops in Nagar district will also be open from 9 am to 9 pm

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यातील दुकाने आता सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरूं राहणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे.

दोन तासांनी वेळ वाढविण्यात आली आहे. या अगोदर सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरु राहत होती. राज्यशासनाने निर्णय घेतल्यानंतर नगर जिल्ह्यातही दोन तासांनी वेळ वाढविण्यात आली आहे, शाळा महाविद्यालये, जिम मात्र ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत.

फिरण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. एक तासांनी वेळ वाढविला आहे. रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. याअगोदर रात्री ९ ते पहाटे ५ अशी वेळ होती.

व्यावसायिक व बिजनेस प्रदर्शन भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. शाळा महाविद्यालय, जिम बंदच राहणार असे आदेशात नमूद केले आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Shops in Nagar district will also be open from 9 am to 9 pm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here