Home अहमदनगर पुरेलेला शिर नसलेला मृतदेह चार दिवसांत धागेदोरे मिळाले

पुरेलेला शिर नसलेला मृतदेह चार दिवसांत धागेदोरे मिळाले

Shrigonda decapitated body was found in four days

श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत शिवारात दिनकर घोडके यांच्या शेताजवळ सोमवारी पुरलेल्या अवस्थेत आढळून आलेला मृतदेह पुणे येथील असल्याचा तपासात श्रीगोंदा पोलिसाना धागेदोरे मिळाले आहे.

टाकळी कडेवळीत शिवारात सोमवारी दुपारी ४५ वर्षीय शिर नसलेला पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावर पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरविली आहेत.

मृतदेहाच्या अंगावरील कपडे व कोणत्या टेलरने हा शर्ट शिवला आहे. टेलरचा सिम्बॉल पुणे बीड सोलापूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनाला ऑनलाईन माहिती कळविली होती. सिम्बॉल व शर्ट, त्याचा रंग नातेवाईक यांनी ओळखला असून ते श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर व्यक्तीचा मृत्यू संपत्तीच्या वादातून किंवा सावकारीतून झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Shrigonda decapitated body was found in four days

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here