Home अहमदनगर शिर्डीतील लॉजवर बहीण-भावंडाची आत्महत्या, एकाच ओढणीने गळफास

शिर्डीतील लॉजवर बहीण-भावंडाची आत्महत्या, एकाच ओढणीने गळफास

Ahmednagar News | Shirdi:  हॉटेल साई यशराजमध्ये साईदर्शनासाठी आलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील बहीण-भावंडांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Sister-brother suicide at Lodge in Shirdi

शिर्डी : शिर्डी शहरातील नगर-मनमाड रोडनजीकच्या हॉटेल साई यशराजमध्ये साईदर्शनासाठी आलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील बहीण-भावंडांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. १५) दुपारी साडे तीन वाजता उघडकीस आली आहे

निखिल किशोर वारुळे (वय ३०, रा. खैरी निमगाव, हल्ली चाकण, पुणे) व निकिता किशोर वारुळे (वय २५) या दोघांनी अज्ञात कारणावरून एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बहीण दत्तक घेतलेली होती मयतांचे गाव खैरीनिमगाव आहे. पण भाऊ तळेगाव दाभाडे येथे नोकरीला होता. त्याचे दहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते. दोघांच्या आत्महत्येचे कारण काय आहे याचा पोलिस शोध घेत आहेत.

हॉटेल चालक वसीम आयुब शेख (रा. शिर्डी) यांनी घटनेची माहिती शिर्डी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक सोपानराव शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयताने डायरीवर वडिलाचा फोन नंबर लिहून ‘आमच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये’, असे लिहिले होते. त्याआधारे वडिलांना फोन करण्यात आला. शवविच्छेदनासाठी रात्री राहाता येथे दोन्ही मृतदेह पाठविण्यात आले. या घटनेबाबत शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Sister-brother suicide at Lodge in Shirdi

(आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here