सिन्नर बस स्टॉपवर शिवशाहीने तरुणाला चिरडले; डोक्यावरुन चाक गेल्याने….
Sinnar Accident: सिन्नर बस स्थानकाच्या प्रवेश द्वाराजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. बसने तरुणाला जागीच चिरडले आहे.
सिन्नर : नाशिक जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर येथील बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर भीषण अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. येथे शिवशाही बसने एका तरुणाला चिरडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की. शुक्रवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास पालघर-शिर्डी शिवशाही बस सिन्नर स्थानकात प्रवेश करत असताना बस स्थानकातून बाहेर पडणारा हा तरुण थेट बसच्या चाकाखाली सापडला. त्याच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्यामुळे ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत.
Web Title: Shivshahi crushes youth at Sinner bus stop
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App