Home अहमदनगर दोन लाख देऊन विवाह केला नवरी दुसऱ्याच दिवशी दागिने घेऊन पसार

दोन लाख देऊन विवाह केला नवरी दुसऱ्याच दिवशी दागिने घेऊन पसार

Ahmednagar Crime  News | Rahuri: गुंगीचे औषध देऊन नवरी पसार (married).

wife got married by paying two lakhs and the very next day she gave away the jewels

राहुरी : पहिल्या पत्नीचे निधन झाल्यामुळे पोटा पाण्याची सोय व्हावी, म्हणून दुसरे लग्न केले, पण नवविवाहित तरुणीने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पतीला चहातून गुंगीचे औषध देऊन घरातील सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना धामोरी खुर्द येथे घडली. लग्न लावून देणाऱ्या दलालांनीही दोन लाख रुपये घेऊन नवरदेवाची आर्थिक फसवणूक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कानिफनाथ श्रीरंग थोरात (वय ५०, रा. धामोरी खुर्द) हे त्यांच्या मुलासह राहत आहेत. त्यांची पत्नी २०१८ मध्ये आजारपणात मयत झाली. घरात दुसरी कोणती महिला नसल्याने कानिफनाथ थोरात व त्यांच्या मुलाचे हाल होऊ लागले म्हणून घरात स्वयंपाक करून घर सांभाळण्यासाठी कानिफनाथ थोरात यांनी दुसरा विवाह करण्याचे ठरविले. या दरम्यान वांबोरी येथील तिघा जणांनी कानिफनाथ थोरात यांना विवाहासाठी मुलगी दाखवली. त्या बदल्यात त्यांनी दोन लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर दि. १३ डिसेंबर रोजी रात्री कानिफनाथ थोरात व सदर मुलीचा विवाह राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील एका मंदिरात लावून देण्यात आला. कानिफनाथ थोरात याने नववधूला काही दागिने घातले. कानिफनाथ नववधूसह धामोरी येथील घरी आले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी (दि. १४) सायंकाळी नवविवाहित तरुणीने पती कानिफनाथ यास चहा करून दिला. चहा प्यायल्यानंतर कानिफनाथ थोरात यांना गुंगी आल्याने ते झोपले. काही वेळाने त्यांचा मुलगा घरी आला. त्याने कानिफनाथ यांना झोपेतून उठविले. त्यावेळी त्यांची नवविवाहित पत्नी घरातून गायब झाल्याचे दिसले. ती अंगावरील दागिने घेऊन पसार झाल्याचे लक्षात आले. दुसरे लग्न केले पण तीही पळून गेली अन आर्थिक फसवणूक झाली आहे.

या घटनेने डोके चक्रावून गेल्याने त्याने लगेच राहुरी पोलिस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: wife got married by paying two lakhs and the very next day she gave away the jewels

(आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here