Home अकोले ब्रेकिंग: भंडारदरा धरणाच्या भिंतीवरून पडुन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यु

ब्रेकिंग: भंडारदरा धरणाच्या भिंतीवरून पडुन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यु

Student dies after falling drowned from Bhandardara dam wall

Akole | अकोले: भंडारदरा धरणाच्या भिंतीवरून मोबाईल वर चित्रीकरण करण्याच्या नादात तोल जाऊन एका शालेय विद्यार्थीनीचा धरणाच्या भिंतीवरुन पडुन बुडून (drowned) दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.  या घटनेमुळे भंडारदरा धरणाच्या ढिसाळ सुरक्षेयंत्रणेचा  बोजवारा उडाला आहे.

उत्तर नगर जिल्ह्याची अकोले तालुक्यातील ब्रिटिश कालीन भंडारदरा धरण हे जीवन रेषा मानली जाते. या धरणाच्या भिंतीवरुन शुक्रवारी दुपारी उज्जला बाळु वैराळ या अकरावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीचा ५० च्या वाॅल जवळ पडुन दुर्दैवी मृत्यु झाला आहे.

भिंतीवर या मुलीचे ओळख पत्र व महाविद्यालयीन सँक एका आठवडे बाजारासाठी जाणा-या महिलेला आढळून आल्याने सदर महिलेने सहज भितीवरुन धरणाच्या तळाशी डोकाऊन बघितले असता एक मुलगी खाली पडली असल्याचे उघडकीस आले. त्या महिलेने तात्काळ ही माहिती धरणावरील सुरक्षेस असलेल्या सुरक्षा पोलिस गार्डने वरिष्ठांच्या कानावर घातली.

मृत मुलीच्या अपघाताचा पंचनामा राजुर पोलिसांनी केला असुन मृतदेह शवविच्छेदनासाठी राजुरच्या ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आहे. याप्रकरणी अधिक तपास राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह देविदास भडकवाड, पोकाॅ दिलीप डगळे, अशोक काळे, अशोक गाडे हे करत आहेत.

Web Title: Student dies after falling drowned from Bhandardara dam wall

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here