Home नाशिक धक्कादायक! ६ वर्षीय चिमुकल्‍याला सोबत घेत पित्‍याची विहिरीत उडी; गाडी उभी असल्‍याने...

धक्कादायक! ६ वर्षीय चिमुकल्‍याला सोबत घेत पित्‍याची विहिरीत उडी; गाडी उभी असल्‍याने उघडकीस

Malegaon: पित्याने आपल्या ६ वर्षीय मुलाला सोबत घेत विहिरीत उडी मारून आत्‍महत्‍या (Suicide) केल्याची घटना.

Suicide case Father jumps into well with 6-year-old child

मालेगाव : नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील आघार- ढवळेश्वर येथील यशवंत लक्ष्मण हिरे या पित्याने आपल्या ६ वर्षीय मुलाला सोबत घेत विहिरीत उडी मारून आत्‍महत्‍या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे

मालेगाव तालुक्यातील अंजग येथील शेती महामंडळाच्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. यशवंत हिरे हे पशुखाद्य विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने काल ते मुलाला सोबत घेऊन निघाले होते. अंजग येथे त्यांनी आपली गाडी लावली होती. अनेक तास गाडी उभी असल्याने परिसरातील स्थानिकांना संशय आल्याने त्यांनी विहिरीजवळ जाऊन पाहिले असता ही घटना समोर आली आहे.

वडणेर- खकुर्डी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यानंतर त्यांनी अग्निशामक दलातील जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणी वडणेर- खकुर्डी पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र यशवंत हिरे यांच्‍या आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Web Title: Suicide case Father jumps into well with 6-year-old child

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here