Home अहमदनगर आ. रोहित पवार यांनी जी शंका उपस्थित केली होती ती अखेर खरी...

आ. रोहित पवार यांनी जी शंका उपस्थित केली होती ती अखेर खरी ठरली

Suspicion raised by Rohit Pawar finally came true

अहमदनगर: देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागताच केंद्रसरकारने पेट्रोल व डिझेलचे दर वाढविण्यात आले आहे. देशात तब्बल ६६ दिवसानंतर इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.

प्रतिलिटर पेट्रोल १५ पैसे तर डीझेल १८ पैशांनी दर वाढले आहे. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दरवाढ झाली आहे. निकालानंतर दरवाढ होऊ शकते अशी शंका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. त्यांनी त्यांचे मत ट्विटरवर मांडले होते. पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर मोदी सरकार इंधन दरवाढ करणार असे रोहित पवार यांनी म्हंटले होते. हे ट्वीट चांगलेच व्हायरल झाले होते. रोहित पवार यांनी २ मे लाच हे ट्वीट केलं होत. निवडणुका कालावधीत तब्बल २ महिने दरवाढ केली गेली नाही. त्याअगोदर कच्चा तेलाचे बाजार कमी असतानादेखील भरमसाठ इंधन दरवाढ केली होती. यावरून विरोधकांनी आंदोलन केलं होत.

रोहित पवार यांनी आता निवडणुकांचे जय पराजय झाले आहेत. थांबलेले दर पुन्हा वाढू लागतात की काय? पुन्हा एकदा महागाईच्या खाईत लोटतात की काय? अशी शंका त्यांनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.

Web Title: Suspicion raised by Rohit Pawar finally came true

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here