Home अकोले राजूर: सर्वोदयच्या विद्यार्थ्यांनीनी सैनिकांना राख्या पाठवून राखीबंधनाचा कार्यक्रम केला साजरा 

राजूर: सर्वोदयच्या विद्यार्थ्यांनीनी सैनिकांना राख्या पाठवून राखीबंधनाचा कार्यक्रम केला साजरा 

राजूर:  अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सैनिकांना स्वतःच्या हाताने बनविलेल्या राख्या पाठवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच विद्यालयात राखीबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

बहिण भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाला बहिणी भावांना राख्या बांधतात. मात्र देशातील जनतेच्या संरक्षणार्थ सीमेवर लढणारे आपले सैनिक बांधव या दिवशी आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. ते कुटुंबापर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यांची बहीणही त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही. अशा सैनिकांसाठी वर्गाशिक्षाकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनीनी स्वतः च्या राख्या बनविल्या. या राख्या सीमेवर असणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी पाठविल्या. त्यासाठी सैनिक बांधवांचे पत्ते घेण्यात आले होते. पोस्टाने त्या राख्या पाठविण्यात आल्या. राखी बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. सैनिकांचे पत्ते मिळवून त्या पोस्टाने पाठविण्यासाठी पगारे सर, श्री. भोसले बी.व्ही. श्री.पांडे आर.पी. श्रीमती. भालेराव एस.बी. श्रीमती. सावंत बिना, श्रीमती. हासे एस. एस. कु. अविज्ञा चासकर यांनी नियोजन केले.

तसेच विद्यालयात विद्यालयाचे प्राचार्य श्री. लेंडे एम.डी. उपप्राचार्य श्री. पर्बत एल.पी. पर्यवेक्षक नरसाळे एस.ए. यांच्या मार्गदर्शनाखाली राखीबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती. भालेराव एस.बी. श्री. बारवकर संतराम, श्री. अजित गुंजाळ यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी श्री. बारवकर संतराम यांनी आपल्या प्रास्ताविकातून राखीबंधनाचे महत्व विषद केले त्यानंतर सर्व विद्यार्थिनीनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना राख्या बांधण्यात आल्या. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री. देशमुख एस.आर. श्री. तारू व्ही.टी. श्री.साबळे आर.डी. यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे आभार श्री. तुपविहिरे एस.व्ही. यांनी मानले.

या उपक्रमाबाबत शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षक वर्गाचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख,  सचिव टि. एन. कानवडे,  सहसचिव मिलिंदशेठ उमराणी,  कोषाध्यक्ष विवेक मदन व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Website Title: SVM Rajur Rakshabandhan function

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here