Home अकोले भंडारदरा येथे पर्यटकांचा धिंगाणा: पत्रकाराला धक्काबुक्की

भंडारदरा येथे पर्यटकांचा धिंगाणा: पत्रकाराला धक्काबुक्की

राजूर: धो धो बरसणारा पाउस व खळखळून वाहणाऱ्या नद्या नाले आणि तुडुंब भरलेली धरणे आणि स्वातंत्र्यदिनाची सुट्टी हा विलक्षण योग जुळवून आल्याने महाराष्ट्रातील नंदनवन असलेल्या भंडारदरा पर्यटनक्षेत्रात पर्यटकांची मांदिआळी पहायला मिळाली मात्र या मांदियाळीत काही मद्यपी व हुल्लडबाजी पर्यटकांमुळे मात्र इतर पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

भंडारदरा येथे काही मद्यधुंद पर्यटकांचा वाहतूक अडवून भर रस्त्यात धिंगाणा सुरु असताना प्रेस फोटोग्रापहर व अकोले तालुका पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख विलास तुपे यांनी हि घटना केमेरात टिपली. याचा राग आल्याने मद्यधुंद पर्यटकाने त्यांच्याकडील केमेरा हिसकून घेण्याचा प्रयत्न करत धक्काबुक्की केली. हि माहिती समजताच पत्रकार संजय महानोर यांनी पोलिसांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिक नागरिकांनी मद्यधुंद पर्यटकांची चांगलीच धुलाई केली. अखेर या गर्दीतून आपली सुटका करत या पर्यटकांनी तेथून पळ काढला.पर्यटकांच्या उपद्रवी धिंगाण्यावर केलेल्या उपाययोजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे. दरम्यान या घटनेचा सर्व पत्रकारांनी निषेध नोंदविला आहे.  

Website Title: Tourist clash at Bhandardara

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here