Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात विश्रामगृहात चोरी

Sangamner: संगमनेर तालुक्यात विश्रामगृहात चोरी

Theft at a rest house in Sangamner taluka

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील विश्रामगृहात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. सुमारे साडे चार हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तसेच दाढ खुर्द येथून दुचाकी चोरीला गेली आहे.

याबाबत बबन बाबुराव ओहोळ यांनी आश्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यात म्हंटले आहे की, दिनांक २७ ते २८ जून दरम्यान निमगाव जाळी येथील सार्वजनिक बांधकाम विभागच्या विश्रामगृहात दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने चार सिलिंग पंखे, तीन नळाचे कॉक असा चार हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे.  

दुसऱ्या चोरीत रखमा साहेबराव जोशी यांनी दिलेल्या तक्रारीत, दिनांक २४ जून रोजी दाढ खुर्द शिवारातील राहत्या घरासमोरील मध्यरात्री बजाज कंपनीची प्लाटीना एम,एच. १७ बी.बी. ४२०२ ही १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.

दरम्यान आश्वी परिसरात चोरीचे सत्र सुरु आहे. चोरट्यांनी दहशत निर्माण केली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Theft at a rest house in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here