व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन मुलीवर सहा जणांचा अत्याचार
15 वर्षीय मुलीचा अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करत तिच्यावर 6 जणांनी आळीपाळीने अत्याचार (Gangrape) केल्याची धक्कादायक घटना.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छत्रपती संभाजीनगर शहरात मन सुन्न करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय मुलीचा अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करत तिच्यावर 6 जणांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा सर्व प्रकार सुरु होता. या घटनेने संभाजीनगर हादरलं आहे. तर या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांविरोधात विधिसंघर्षग्रस्त बालकावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक तसेच आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय चव्हाण असे मुख्य आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलीवर सुरुवातीला ओळखीच्या अक्षय चव्हाण नावाच्या मित्राने अत्याचार केला. अत्याचार करतानाचा व्हिडीओ देखील बनवला. पुढे पीडित मुलीला तोच व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केलं. धक्कादायक म्हणजे त्याच्या अन्य सहा ते सात मित्रांना या पाशवी कृत्यात सहभागी केले. या आरोपींकडून मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. तसेच तिने नकार दिल्यास तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात येत होती. दरम्यान सततच्या या अत्याचाराला कंटाळून मुलीने पळून जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी ती रेल्वे स्थानकावर सुद्धा पोहोचली. पण तिला एकटे पाहून, तिच्या हालचालीवरुन पोलिसांना संशय आला आणि हा सर्व प्रकार समोर आला.
14 वर्षीय मुलीवर अक्षयने सातत्याने अत्याचार केला. अक्षयने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मित्रांकडूनही तिच्यावर अत्याचार केले. एक-दोन नाही, तर तब्बल सहा मित्रांनी तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. सातत्याने विविध ठिकाणी नेत ब्लॅकमेल करत अत्याचार करुन निर्दयीपणे छायाचित्रण करत गेले. मित्राकडून सुरु झालेल्या अत्याचाराबाबत कोणाला सांगायचे, कोणाकडे व्यक्त व्हायचे हा प्रश्न मुलीसमोर होता. यातच तिला पुन्हा एका मित्राने तिच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचे ठरवत सोबत पळून जाण्याचे आश्वासन दिले. तणावाखाली गेलेल्या मुलीचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याच्या सांगण्यावरुन 18 मे रोजी तिने घरातील वीस हजार रोख, सोन्याचे दागिने, वडिलांचा मोबाईल फोन घेऊन पोबारा केला. रात्री बारा वाजता एकटी रेल्वे स्थानकावर मित्राची वाट पाहत उभी होती. मित्र मात्र आलाच नाही. स्थानकावरील एका पाणी विक्रेत्याला हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने रेल्वे पोलिसांना कळवले. रेल्वे पोलिसांनी शहर पोलिसांना कळवले. दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक अनिता फसाटे यांनी पथकासह धाव घेत तिला ताब्यात घेतले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.
Web Title: Threatening to make the video viral, six persons Gang Rape a minor girl
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App