Home क्राईम अहमदनगर ब्रेकिंग: दोघा जणांनी तरुणाची चॉपरने वार करून हत्या

अहमदनगर ब्रेकिंग: दोघा जणांनी तरुणाची चॉपरने वार करून हत्या

Ahmednagar | Shrirampur News:   मागील भांडणाच्या कारणातून आपापसातील झालेल्या वादात दोघा जणांनी तरुणाची चॉपरने वार करून हत्या (Murder) केल्याची घटना.

Two persons Murder a young man by stabbing him with a chopper

श्रीरामपूर:  येथील गोंधवणी रोड परिसरात मागील भांडणाच्या कारणातून आपापसातील झालेल्या वादात काल पहाटे 4 वाजता दोघा जणांनी तन्वीर शाह या तरुणाची चॉपरने वार करून हत्या केली. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काल पहाटे गोंधवणी रोड परिसरात तन्वीर शाह हा थांबलेला असताना रुपेश शिंदे (बाबजी),सुनिल देवकर या दोघांनी तन्वीर शाह याला अडवून शिवीगाळ करून चॉपरने आठ ते दहा वार करून हत्या केली.

घटनेनंतर दोघेही मारेकरी पसार झाले. पोलिसाना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले सध्या गोंधवणी गावात वातावरण तणावाचे झाल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Web Title: Two persons Murder a young man by stabbing him with a chopper

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here