Home भंडारा धक्कादायक: महिला कपडे धुवायला गेली ते परत आलीच नाही, रक्तबंबाळ मृतदेह  

धक्कादायक: महिला कपडे धुवायला गेली ते परत आलीच नाही, रक्तबंबाळ मृतदेह  

woman went to wash the clothes but did not return, blood died body corpses

भंडारा | Bhandara: कपडे धुवायला गेलेल्या महिलेचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह (Dead Body) आढळून आल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवेगांव जंगल शिवरात घडली. बबिता तिरपुडे (वय 45) असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

नवेगांव जंगल परिसरातील तलवाकड़े बबिता तिरपुडे या कपड़े धुण्यासाठी गेल्‍या होत्‍या. कपडे धुवून येण्यास उशिर होऊन सुद्धा घरी परत न आल्याने कुंदा मेश्राम तिला शोधायला गेली. यावेळी बबिता यांचा तलावाजवळ मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. कुंदा यांनी लागलीच या घटनेची माहीती कारधा पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरु केला आहे.

मयत महिलेच्या डोक्यावर कोणत्यातरी हत्याराने वार करून तिचा गळा दाबुन खून (Murder) केल्याचे प्राथमिकदृष्‍ट्या दिसून आले आहे. कारधा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करत त्या दृष्टिने तपास सुरु केला आहे. आरोपीचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

Web Title: woman went to wash the clothes but did not return, blood died body corpses

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here