संगमनेर: प्रवरा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातील नवीन नगर रोड परिसरात राहणाऱ्या घरातून कचरा टाकण्यासाठी बाहेर गेलेली महिला दुपारपर्यंत घरी आलीच नाही. घरातील नातवाईक यांनी शोध घेतला असता या महिलेचा मृतदेह प्रवरा नदी पुलाच्या खाली दुपारी दोन वाजेच्या सुमारास आढळून आला.
रोहिणी भागवत काळे वय ५६ असे या मयत महिलेचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, संगमनेर शहरातील नवीन नगर रोड परिसरात राहत असणारी रोहिणी भागवत काळे या घरातील कचरा टाकण्यासाठी बाहेर पडल्या मात्र त्या पुन्हा घरी न आल्याने घरच्यांनी त्यांची शोधाशोध केली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास या महिलेचा मृतदेह प्रवरा नदीच्या पुलाखाली काहीना आढळून आला. ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या महिलेला तत्काळ घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सदर मयत महिलेने आत्महत्या केली का आणखी काही प्रकार आहे याचा अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Woman’s body found in Pravara river Sangamner