Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू
कुकाणे | Accident: रस्त्यावर रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने अपघात घडला. भेंडे कूकाणे रस्त्यावर भेंडे बुद्रुक नजीकच्या मळीच्या ओढा पुलावर झालेल्या रस्ता अपघातात नेवासे तालुक्यातील माळी चिंचोरा येथील दुचाकीवरील दोघां तरुणांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नितीन सोमनाथ पुंड वय २८ रा. माळी चिंचोरा ता. नेवासे ठार झाला आहे. तर रमेश ज्ञानदेव पुंड हा जबर जखमी झाला आहे.
शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास भेंडे येथे हा अपघात झाला. दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. कुकाणे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे.
Web Title: Accident Bhenda kukane Road