भंडारदरा | Bhandardara: भंडारदरा पाणलोट क्षेत्रात रविवारी मान्सून (Monsoon) दाखल झाल्याचे संकेत मिळत आहे. या परिसरात रविवारी सायंकाळी पाच वाजेपासून पावसाच्या (Rain) हलक्या सरी कोसळत आहे. मात्र पावसाने जोर घेतलेला नाही. अधूनमधून सरी कोसळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पाणलोटक्षेत्रात वातावरण बदलले आहे. ढगांची गर्दी होऊ लागली आहे. सायंकाळी पावसास सुरुवात झाली आहे. अद्याप पावसाचा जोर नसला तरी दोन तीन दिवसांत जोर वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान सायंकाळी 5 ते 6 या वेळेत पडलेल्या पावसाची नोंद 7 मिमी झाली आहे. त्यानंतरही अधूनमधून सरी कोसळत होत्या. त्यामुळे पाणलोटात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. यंदा काहीसा उशीरा मान्सून दाखल झाला आहे. पण तो पडता झाल्याने शेतकर्यांच्या आशा बळावल्या आहेत. भंडारदरा पाणलोटात किती पाऊस पडतो यावर उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकरी पिकांचे नियोजन करीत असतो. कारण या धरणातील पाण्यावरच येथील शेतीचे भवितब्य अवलंबून आहे.
Web Title: Arrival of monsoon in Bhandardara catchment area