Home क्राईम Crime: माजी नगरसेवकासह सहा जणांवर गुन्हा

Crime: माजी नगरसेवकासह सहा जणांवर गुन्हा

Shrirampur Crime News: नवऱ्याने वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल.

crime-against-six-people-including-former-councillor

श्रीरामपूर : शहरातील एका ३२ वर्षीय तरुणीला माजी नगरसेवक व त्याच्या नातेवाईकांनी, तसेच नवऱ्याने वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासरी नांदत असताना विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला. तिला घरात घुसून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग करण्यात आला. आरोपींनी आपल्याला मारहाण केली.

घराच्या बाहेर काढून देऊन शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली, असे पीडितेने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावरून सहा आरोपींविरुद्ध विनयभंग व जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: crime-against-six-people-including-former-councillor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here