Murder: बापानेच केला स्वतःच्या मुलाचा खून
Murder: सोमनाथ गोरख कर्पे वय १८ असे या खून झालेल्या मयत मुलाचे नाव आहे.
वडील गोरख कर्पे हा कायम दारू पीत असल्याने घरात नेहमी किरकोळ वाद सुरु होत होते. सोमवारी दि. २९ रोजी सणाच्या दिवशी गोरख दारू पिऊन घरी आला. पत्नी ताराबाई सायंकाळी शेतात्तून घरी परतली. आज होळीचा सन असून तुम्ही सणासुदीच्या दिवशी का पिऊन आला असे विचारले. त्यावेळी गोरख पत्नीला मारण्यास पुढे आला असता मुलगा सोमनाथ मध्ये आला. त्यावेळी गोरखने मुलाला शिवीगाळ करत घरातून बाहेर निघून गेला.
त्यांनतर ताराबाई व मुलगा सोमनाथ हे दोघे जेवण आटोपून रात्री १० वाजेच्या सुमारास उसाच्या शेतात पाणी भरायला गेले. तारबाईची जाव मुक्ता कर्पे या त्यांच्या पिकाला पाणी भरण्यास आल्या होत्या. सोमनाथ हा उसाला पाणी देत होता तर त्याची आई उसाच्या शेवटच्या टोकाला पाणी पोहोचल्यावर आवाज देवून सांगत होती. या दोघांत १०० फुटांचे अंतर होते.
पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास सोमनाथचा ओरडल्याचा आवाज आल्याने ताराबाई पळत त्याच्याकडे आली. त्यावेळी गोरख त्याच्या डोक्यावर लोखंडी गजाने मारहाण करत होता. या मारहाणीत सोमनाथ गंभीर जखमी झाला. ही घटना सामाजाताच शेजारीच पिकाला पाणी देत असलेले मुक्ता कर्पे, अंबादास जाधव हे घटनास्थळी आले. त्यांनी जखमी सोमनाथ यास नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला. मयत मुलाची आई ताराबाई हिने पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पसार झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुजित ठाकरे हे करीत आहे.
Web Title: Father Murder the son