Home अहमदनगर जिल्ह्यात खळबळ: शंकरराव गडाख यांच्या बंधूच्या पत्नी गौरी गडाख यांची आत्महत्या

जिल्ह्यात खळबळ: शंकरराव गडाख यांच्या बंधूच्या पत्नी गौरी गडाख यांची आत्महत्या

Gauri Gadakh Suicide 

अहमदनगर: जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची सून आणि राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांनी आत्महत्या केली आहे. मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. या घटनेमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती समजताच तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

गौरी गडाख यांचे माहेर लोणी ता. राहता येथील आहे. गौरी या प्रशांत गडाख यांच्या पत्नी आहेत. गौरी गडाख या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत होत्या. नगर शहरातील यशवंत कॉलनीमध्ये गौरी यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र चर्चा सुरु आहे. गौरी गडाख यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरु आहे. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनतर तोफखाना पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु आहे.

 महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Gauri Gadakh Suicide 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here