Home संगमनेर संगमनेर शहरात दोन तर ढोलेवाडी येथे एक करोनाबाधित

संगमनेर शहरात दोन तर ढोलेवाडी येथे एक करोनाबाधित

संगमनेर: संगमनेर शहरात आज आणखी तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १५२ झाली आहे.

संगमनेर शहरातील पंजाबी कॉलनी येथील ४० व ४५ वर्षीय व्यक्तीना करोनाची लागण झाली आहे. त्यांना मागील बाधित व्यक्तीच्या संपर्कातून करोनाची बाधा झाली आहे.

तसेच संगमनेर शहरालगत ढोलेवाडी येथे एक करोणाचा रुग्ण आढळून आला आहे. हा व्यक्ती बाहेरगावाहून आल्याचे समजते. संगमनेर यथील स्थानिक प्रशासन या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेत आहे.

संगमनेर तालुक्यातील एकूण करोना बाधितांची संख्या १५२ झाली आहे. तर आज संगमनेर शहरातील सय्यदबाबा चौक येथील ७० वर्षीय वृद्धाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुळे मयतांची संख्या १२ झाली आहे.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Latest News Sangamner three corona patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here