Home अहमदनगर नदीच्या पुलावरून गाडी थेट खाली कोसळल्याने सात मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू

नदीच्या पुलावरून गाडी थेट खाली कोसळल्याने सात मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra Wardha Car Accident

Maharashtra Wardha Car Accident:  वर्धा देवळी मार्गावरील सेलसुरा इथं काल रात्री दीडच्या वाजेच्या सुमारास नदीच्या पुलावरून गाडी थेट खाली कोसळून झालेल्या अपघातात सात तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गाडीतील हे विद्यार्थी होते सावंगी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातले. या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना तसंच जखमींना मदत जाहीर केली आहे.

अधिक माहिती अशी की,  देवळी येथून वर्धाला येत असताना सेलसुरा जवळ हा अपघात झाला. वाहनावर नियंत्रण सुटल्यामुळे जवळील नदीच्या पुलावरून वाहने थेट खाली पडलं. जवळपास ४० फूट लांब व रुंद चारचाकी वाहन खाली पडल्याने भीषण अपघात झाला.

या अपघातात २५ ते ३५ वयोगटातील तरुण आहेत. रात्री १ वाजेच्या सुमारास नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.  चार वाजेपर्यंत मृत्यूदेह बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अद्यापही इतर मृतदेहांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून ट्वीट करत मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सेलसुराजवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Web Title: Maharashtra Wardha Car Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here