Home महाराष्ट्र राज्यात १०० युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याचा विचार: उर्जामंत्री

राज्यात १०० युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याचा विचार: उर्जामंत्री

मुंबई(News): महाराष्ट्रातील १०० युनिटपर्यंतची वीज वापर असलेल्या ग्राहकांना मोफत वीज देत्ता येऊ शकते का?  या प्रस्तावावर सरकार विचार करत आहे. याबाबत नेमण्यात आलेली समिती तीन महिन्यात अहवाल देणार आहे. अहवालावर समग्र चर्चा करून त्यानंतर पुढची पावले उचलण्यात येतील अशी माहिती उर्जामंत्री डॉ. नितीन राउत यांनी दिली.

राज्यातील १०० युनिटपर्यंतच्या वीज गग्राहकांना मोफत वीज येत्या वर्षभरात देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र आघाडी सरकारचा विचार आहे. त्यासाठी उपाययोजना ही करण्यात येत आहे. महावितरण तसेच उर्जा खात्यावरील कर्जाचा बोजा कमी करणे, गळती रोखणे, वसुलीचे नवीन निकष तयार करून सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे नितीन राउत यांनी सांगितले.

वीजउत्पादन खर्च कमी करण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर वीजदरात दिलासा देता येऊ शकतो. महावितरणासह तीनही कंपन्यांना त्यांच्या खर्चात कपात करण्यास सांगण्यात आले आहे. योजनाही तयार करण्यात येणार आहे.  १०० युनिटपर्यंतच्या वीज ग्राहकांना कसा दिलासा देता येऊ शकेल यासाठी उर्जा खात्यातील अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. तीन महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर सरकार पातळीवर प्रस्तावावर विचार करून मोफत वीजबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Website Title: News electricity free of charge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here