Home महाराष्ट्र कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली, कोरोनानंतर आणखी एका आजाराची लागण

कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली, कोरोनानंतर आणखी एका आजाराची लागण

Rajiv Satav's health deteriorated

पुणे: राज्यसभा सदस्य राजीव सातव यांनी काही दिवसांआधीच कोरोनावर मात केली होती. पण पुन्हा त्यांची प्रकृती खालवली असल्याची माहिती मिळते, त्यांना निमोनियाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

खासदार राजीव सातव (Rajiv Satav)यांना कोरोनाची लागण झाल्यावर पुणे येथील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. २५ एप्रिल रोजी त्यांची प्रकृती खालविल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ते अखेर कोरोनातून बरे झाले. कोरोना अहवाल निगेटिव्ह आला त्यांना डिस्चार्ज मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे.  न्युमोनियाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे.

अखेर या जीवघेण्या कोरोनावर र सातव यांनी यशस्वी मात केली पण आता न्युमोनियाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. यामुळे पक्षातही चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Rajiv Satav health deteriorated

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here