Home अहमदनगर शिर्डी गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना अटक, पोलीस कोठडी

शिर्डी गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना अटक, पोलीस कोठडी

Shirdi Firing Case two arrested

शिर्डी | Firing Case: शिर्डी शहरात दुकानासमोरील जागेच्या वादातून शिर्डीतील तरुणावर गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी घडली. यामध्ये तरुणाची प्रकृती गंभीर आहे. गोळीबार करणाऱ्या दोघांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी गोंदकर व दीपक गोंदकर या दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तीन आरोपी अद्याप पसार आहेत अशी माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक माने यांनी दिली आहे.

शुक्रवारी झालेल्या गोळीबारात सुरज ठाकूर हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सचिन ठाकूर याने दिलेल्या फिर्यादीवरून किरण हजारे, तनवीर रंगरेज, अक्षय लोखंडे, दीपक गोंदकर आणि रवी गोंदकर यांनी गोळीबार केल्याची म्हंटले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील व सहायक पोलीस निरीक्षक माने हे करीत आहे.  

Web Title: Shirdi Firing Case two arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here