Home अकोले कोतूळ : २४ तास दंश केलेला साप महिलेच्या कपड्यात

कोतूळ : २४ तास दंश केलेला साप महिलेच्या कपड्यात

कोतूळ : २४ तास दंश केलेला साप महिलेच्या कपड्यात

कोतूळ : सापाने दंश केल्याने आदिवासी महिला रुग्णालयात दाखल झाली. रुग्णालयात डॉक्टरांनी उपचार सुरू केले. परंतु २४ तास उलटल्यानंतर रुग्णालयात तिच्या कपड्यातच साप आढळून आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. परंतु डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे ‘त्या’ महिलेचे प्राण वाचले. ही घटना संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर जवळील मामेखेल येथे घडली.
मामेखेल गावातील इंदुबाई भास्कर करवंदे  ही महिला  १३ जून रोजी आपल्या नातेवाईकांकडे आंबेरसासाठी गेल्या. रात्री उशिरा त्या मामेखेलला परतल्या. मात्र १४ जूनला पहाटे चार वाजता त्यांच्या पोटात दुखायला लागल्याने व  श्वास मंदावला म्हणून दुचाकीने अकोले येथील भांडकोळी हॉस्पिटलमध्ये पहाटे पाच वाजता दाखल केले. आंबेरस खाल्ल्याने पोट दुखते असे सांगितले. मात्र डॉ.भांडकोळी यांनी रुग्णाची लक्षणे पाहून विषारी साप चावल्याचे सांगितले. मात्र रूग्णाचे नातेवाईक ते मान्य करेनात. रूग्ण बेशुद्ध पडल्याने त्याला कृत्रिम श्वास सुरू केला. मन्यार सापाच्या दंशाचे उपचार सुरू केले.

You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19

मन्यारच्या लक्षणानुसार उपचार सुरू ठेवल्याने १५ तासांनी रूग्ण जरा शुद्धीवर आली. १५ जूनला पहाटे चार वाजता रुग्णाच्या मानेवर व तोंडावर अडीच ते तीन फुटाचा साप वळवळू लागल्याने रुग्णाने हातपाय आपटायला सुरुवात केली. हॉस्पिटलमधील इतर रुग्णांच्या ही बाब लक्षात आली. साप दिसल्याने रुग्णालयात एकच गोंधळ झाला. इतर रुग्ण भितीमुळे मोठमोठ्याने आरडाओरड करु लागले. प्रसंगावधान राखून डॉ. भांडकोळी यांनी अकोले येथील सर्पमित्र धनंजय मोहिते यांना बोलावून मन्यार जातीचा साप पकडला. चक्क चोवीस तास हा विषारी साप महिलेच्या अंगावरील नेसत्या कपड्यात बसून होता. मात्र डॉक्टरांच्या सजगपणामुळे इंदुबाईचे प्राण वाचले हे नक्की.रविवारी १ जुलैला रूग्ण पूर्ण बरा झाल्याने त्यांना डॉक्टरांनी घरी सोडले.

You Might Also Like: Jacqueline Fernandez bikini images 

रक्ताभिसरण संस्था कमकुवत झाली होती. यावरून ही मन्यार दंशाची लक्षणे दिसू लागली. उपचार सुरू ठेवले. साप चावल्याचे निदान झाल्याने योग्य उपचार करता आले. –डॉ. एम. के. भांडकोळी, अकोले.


Job vacancy in Axis Placement Services

Sector & post:- 1)Pune Mumbai Airport, 2) Finance Company, 3) HDFC Bank,4) Bandhan Bank, 5) Axis Bank, 6) Data Entry and Office Job,7)Job for ITI Candidate, 8) Job For Engineering Candidate (Any Diploma or BE).

Company Role Job, Direct Joining.
Note :- Salary post Depend on ur Education, Experience, & personality
Qualifications: Ssc and above
Fresher’s or experiences can apply.
Axis Placement jOb Services
Call for Detail or Whats App:- 9422567922.7057093238

OM SAI Securty Systems
Contact On 9850214201

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here