Home अहमदनगर महिला ग्रामसेवकास धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी

महिला ग्रामसेवकास धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी

Women gram sevak pushed and threatened to kill

शेवगाव: शेवगाव तालुक्यातील प्रभूवाडगाव येथील महिला ग्रामसेवकास धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वाळू वाहतूक करणारा दत्तात्रय जायभाय यांच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संचिता शामुवेल दळवी यांनी फिर्याद दाखल केली आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रभूवाडगाव येथे शिवस्वराज्य दिनाची तयारी करण्यासाठी ग्रामसेवक महिला चालल्या होत्या. त्यावेळी त्यांना तेथील ग्रामपंचायत शिवारातील शेती गट नंबर १३९ मध्ये गावासाठी नियोजित चालू असलेल्या विहिरीच्या कामाजवळ खोदून ट्रक्टरमध्ये वाळू भरली जात होती. ही जागा ग्रामपंचायतची आहे येथे खड्डे खोडू नका असे ग्रामसेविका म्हणाल्या. त्यावर वाळू वाहतूकदार दत्तात्रय जायभाय याने ही जागा तुमच्या बापाची आहे का? असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यास येथून ट्रक्टर घेऊन जाऊ नकोस असे ग्रामसेविकेने सांगितले यावेळी ग्रामसेविकेने तहसीलदार यांना संपर्क साधून घडलेल्या प्रकारची माहिती सांगितली. याचाच राग आल्याने जायभाय याने ग्रामसेविकेला धक्काबुक्की केली. यात ग्रामसेविकेचे मंगळसूत्र गहाळ झाले. यावेळी जायभाय याने मारहाण करून दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली असे ग्रामसेविकेने फिर्यादीत म्हंटले आहे. या मारहाणीत ग्रामसेविका जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

Web Title: Women gram sevak pushed and threatened to kill

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here