Home Uncategorized सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, काहींचा संसार उघड्यावर

सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, काहींचा संसार उघड्यावर

Sinnar Rain:  वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे येथील स्थानिक व्यवसायिकांचे व काही राहत्या घरांचे छप्पर उडाले.

Heavy rain with gale in Sinnar taluka

सिन्नर: तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने  वादळी वाऱ्यासह अचानक हजेरी लावल्याने वावीसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घरांची पत्रे उडून गेल्याने काहींचा संसार उघड्यावर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे येथील स्थानिक व्यवसायिकांचे व काही राहत्या घरांचे छप्पर उडाले. तर सिन्नर-शिर्डी महामार्गावरील उड्डाण पुलावर असलेले विजेचे खांब अस्ताव्यस्त झाल्याचे दिसत आहे. तसेच येथील लकी जुस सेंटर पूर्णपणे उध्वस्त झाले असून या सेंटरचे पत्रे जवळपास ५०० फूट लांब पडल्याचे दिसत आहे.

त्याचबरोबर येथील ग्रामस्थ सुनील काटे यांची दुकानाची टपरी ही वाऱ्याने जवळपास एक हजार फूट लांबीवर जाऊन अस्ताव्यस्त पडली आहे. तर वावी परिसरातील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून हजार ते पाचशे फूट लांबीवर जाऊन पडलेले आहेत. तसेच पावसाबरोबर गारा देखील पडल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.

यासोबतच काहींच्या घराचे पत्रे उडाल्याने सगळा संसार उघड्यावर आला आहे. तर रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे कार्य सुरु आहे. तसेच नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Heavy rain with gale in Sinnar taluka

Sangamner Akole News Whats app Marketing

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here