Home महाराष्ट्र राज्यव्यापी मराठा आरक्षण चिंतन परिषद ही आज लातूर येथे अत्यंत शिस्तीत संपन्न-...

राज्यव्यापी मराठा आरक्षण चिंतन परिषद ही आज लातूर येथे अत्यंत शिस्तीत संपन्न- आंदोलनाची दिशा आणि आचारसंहिता

राज्यव्यापी मराठा आरक्षण चिंतन परिषद ही आज लातूर येथे अत्यंत शिस्तीत संपन्न

 °°° *आंदोलनाची दिशा आणि आचारसंहिता* °°°

★ – 9 – ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत चक्काजाम 
 – महाराष्ट्रात एकूण 36 – जिल्हे ,360 – तालुके ,जवळपास –  40,000 खेडी आहेत. यापैकी साधारण 7 – 8, हजार खेडी ही राज्य मार्गाला लागून / राष्ट्रीय महामार्गा लगत आहेत.
 – अशा गावातील मराठा बांधव त्या महत्वाच्या रस्त्यावर उतरतील तेही बेमुदत रास्ता रोको / चक्काजाम किंवा काहिही म्हणा, परंतु दैनंदिन जीवन हे  रस्त्यावर घेऊनच उतरतील.
 – सार्वजनिक जेवणाच्या पंगती होतील. पाऊसा पासून संरक्षण व्हावे म्हणून पत्र्याचे शेड उभारले जातील.
 – कीर्तनाचे, भजनाचे, व्याख्यानाचे कार्यक्रम इथेच होतील.
★ – या दरम्यान फक्त दवाखाने चालू राहतील आणि फक्त आणि फक्त अँबूलन्सला रास्ता करून दिला जाईल.
★ – या आंदोलनात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होणार नाही. आमचा हा लढा प्रस्थापित मराठा, प्रस्थापित राजकीयनेते, रक्त पिपासुंच्या, सरंजामशाहीच्या आणि शोशीतांच्या विरोधात आमचा म्हणजे शोषित आणि वंचितांचा असणार आहे.
★ – लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनाला पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे     आरक्षण मागतोय तर आम्हाला पोलीस प्रशासनाने संरक्षण द्यावे कारण “२६/११” मध्ये आपणच देशाचे संरक्षण केले आहे, करत आहात आणि यापुढेही करत रहाल.
परंतु पोलीस प्रशासनाच्या  माध्यमातून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही “समर्पण” आंदोलन सुरू करू . 
 – समर्पण – म्हणजे जेलभरो करू आणि जेलमध्ये आमचे “आमरण उपोषण” सुरू राहील.
★ – हा लढा कोणत्याही “जाती” विरोधात नाही त्यामुळे इतर समाजाच्या लोकांनी विरोध करण्याचे आणि आम्ही सांस्कृतिक “दहशत” वाढवण्याचे कारणच नाही ! ! !  परंतु _ राजकीय हस्तक्षेपातुण ( सत्ताधारीच नाही तर विरोधक सुध्दा ) सांस्कृतिक दहशतीचे, जाती -पातीचे वातावरण निर्माण करतील किंवा केलं जाऊ शकत ते हणून पाडण्यासाठी आपण प्रयत्नशील आणि जागरूक राहून इतर बांधवासोबत समन्वय साधायला पाहिजे.
 – जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही  तोपर्यंत मराठा समाज कोणत्याही प्रकारचा कर सरकार दरबारी भरणार नाही.
★ – या आंदोलनात मराठा समाजातील पोलीस प्रशासन व संरक्षण खात्यातील लोक वगळता सर्वच नोकरदार वर्ग सहभागी असेल.
★ – आंदोलनाच्या तयारीसाठी सहा दिवस बाकी असल्यामुळे  7- ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सर्वच तालुक्यात, तालुका स्तरीय बैठका घेऊन प्रत्येक तालुक्यात जवळपास, साधारण 50 – 60 ठिकाणी आंदोलनाला सुरुवात  होईल असे नियोजन करण्यात येईल. ( प्रत्येक तालुक्यात 50 – 60 ठिकाणी एकदाच आणि बेमुदत आंदोलन म्हणजे जवळपास २०,००० ठिकाणी हे आंदोलन चालू राहील )
★ – कुणीही सरकार सोबत ठोस निर्णय नसताना पोकळ चर्चा करून आंदोलन मागे घेणार नाही नव्हे तर चर्चाच करणार नाही, तसेच “विरोधकांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार  नाही”.
★ – या आंदोलनात समन्वय , व्यापकता, आत्मीयता आणि तळमळ असणार आहे आणि सर्वांमध्ये सर्वसमावेशक एकवाक्यता असणार आहे.
 *°°°विद्यार्थी आंदोलनाची दिशा°* °°
★ मराठा विद्यार्थ्यांचा बेमुदत शिक्षणावर बहिष्कार
आहे त्यामुळे मराठा विद्यार्थी शाळा कॉलेज ला जाणार नाहीत.
 – शाळा कॉलेज मधे काळ्या फिती लावून या शिक्षण व्यवस्थेचा निषेध करू आणि शिकवणी वर बहिष्कार टाकून प्रत्येक शाळा कॉलेज मधे ठिय्या मांडून बसू.
 – शेवटचं करू आणि बघू कशी दखल घेतली जात नाही ते ! ! !_
*विकासात्मक वाटचाल*
★ प्रत्येक जिल्ह्यात सर्वसाधारण ( जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार ) 2,000 – 5,000 विद्यार्थी राहतील अशा “भव्य आणि दिव्य” वसतिगृहांची निर्मिती सामाजिक योगदानातून केली जाईल.
 – त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याची पाच – सदस्यांची समिती बनवली जाईल आणि या पाच सदस्यानां रोजगारही दिला जाईल, मग सरकार वसतीगृह ज्या वेळेस बांधायची त्या वेळेस बांधील भरवश्यावर न राहता हा उपक्रम हातात घेतला जाईल.
जयोस्तू मराठा  
एक मराठा लाख मराठा 

websites

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports,Entertainment NewsSangamner Taluka NewsAkole Taluka NewsC News Sangamner and local news from all cities of Maharashtra.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here