Home अहमदनगर अहमदनगर: तलाठ्याचा मदतनीस लाचेच्या जाळ्यात

अहमदनगर: तलाठ्याचा मदतनीस लाचेच्या जाळ्यात

Breaking News | Ahmednagar: गहाण खताची नोंद वडिलांच्या सात-बारावर लावण्यासाठी बाभळेश्वर खुर्द येथील तलाठ्याच्या मदतनिसाने पाचशे रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा लोणी पोलिस ठाण्यात दाखल.

Talatha's helper in bribery trap

राहता  : गहाण खताची नोंद वडिलांच्या सात-बारावर लावण्यासाठी बाभळेश्वर खुर्द येथील तलाठ्याच्या मदतनिसाने पाचशे रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा लोणी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. शरद भाऊसाहेब चेचरे (वय ४६) असे त्याचे नाव आहे. तक्रारदारांच्या वडिलांच्या नावावर बाभळेश्वर खुर्द (ता. राहाता) येथे असलेल्या प्लॉटचे दि. १३ जून २०२४ रोजी तक्रारदार व त्यांच्या वडिलांच्या नावाने १५ लाखांचे गहाणखत केलेले आहे. त्या गहाण खताची नोंद तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे क्षेत्र असलेल्या सात बारा उताऱ्यावर घेण्याकरिता तलाठी कार्यालयात गेले होते. तिथे मदतनीस असलेल्या चेचरे याने तलाठी व स्वतः करिता लाचेची मागणी केली. याबाबत

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १८ जून २०२४ रोजी तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर लाच मागणी पडताळणीदरम्यान चेचरे यांनी तक्रारदाराकडे पंचांसमक्ष तलाठी मंडलिक यांच्याकरिता व स्वतः करिता पाचशे रुपयांची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविली. याबाबत लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Web Title: Talatha’s helper in bribery trap

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here