Home अहमदनगर वृद्धाला कारमध्ये टाकून नगर बाहेर नेऊन लुटले

वृद्धाला कारमध्ये टाकून नगर बाहेर नेऊन लुटले

Theft old man was thrown into a car and taken out of town

अहमदनगर| Theft: पाथर्डीला जाण्यासाठी निघालेल्या एका वृद्धाला चाकूचा धाक दाखवून गुंगीचा स्प्रे मारून २१ हजार रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे.

नामदेव विठ्ठल पाखरे वय ६० रा. वडुले ता. शेवगाव असे लुटलेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चौघाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी नामदेव विठल पाखरे माळीवाडा बस स्थानकाच्या आउट गेटला पाथर्डीकडे जाण्यासाठी उभे होते. कारमधून आलेल्या चौघांनी त्यांना कुठे जायचे आहे असे विचारले. नामदेव यांनी पाथर्डीला जायचे आहे असे सांगितले. तुम्हाला पाथर्डीला सोडतो असे म्हणत लुटारूनी त्यांना कारमध्ये बसविले. पाथर्डी रोडने शहापूर शिवारात घेऊन जात असताना चाकूचा धाक दाखवून गुंगीचा स्प्रे फवारणी केली. त्यांच्या खिशातील २१ हजार रुपयाची रक्कम कडून घेत चोरट्यांनी पोबारा केला. पाखरे यांनी पुन्हा नगरमध्ये येत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Web Title: Theft old man was thrown into a car and taken out of town

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here