Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात पाउस आणि गारठ्यामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यात पाउस आणि गारठ्यामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू

Two Dead Bodies in Shirdi

शिर्डी | Two Dead Bodies in Shirdi: शिर्डीत गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाउस पडत आहे सोबत गारठ्याने नागरिक कडाडले आहे. यामुळे शिर्डीत पाउस आणि गारठ्यामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.. शिर्डीत उदरनिर्वाहसाठी आलेल्या दोन व्यक्तींचे मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आले आहेत. त्यामधील एकाची ओळख पटली असून एकनाथ हाटे असे त्याचे नाव आहे. ते मुळचे कल्याणाचे आहे. तर दुसरी व्यक्तीची ओळख अजून पटलेली नाही. दुसरी व्यक्ती शिर्डीत म्हणून भिक्षेकरू म्हणून राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शिर्डीत कोसळत असलेल्या पाउस आणि गारठ्यामुळे या दोन्ही व्यक्तीचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिर्डीतील नगर मनमाड महामार्गावर एक आणि कनकुरी रोडलगत असलेल्या ओढ्याजवळ एक मृतदेह आढळून आला आहे.

Web Title: Two Dead Bodies in Shirdi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here