coronavirus: करोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर आईचे वर्षश्रद्ध साजरे केले अनोख्या पध्दतीने
अकोले(coronavirus): कोरोनाचा प्रसार होऊ नये व प्रशासनाने दिलेले आदेश पाळून गर्दी न करता निधनानंतर अस्थी विसर्जनाच्या वेळी केलेले वृक्षाचे पूजन करून आईचे प्रथम पुण्यस्मरण साजरे करून व पर्यावरण रक्षणाचा आदर्श व रुंभोडी येथील देशमुख परिवाराने निर्माण केला आहे.
अकोले तालुक्यातील युवा कीर्तनकार ह.भ.प. दीपक महाराज देशमुख हे महाराष्ट्र भर आपले कीर्तनातून पर्यावरण रक्षण करण्यासाठी अस्थी विसर्जन नदीत न करता आपले शेतात करा व त्यावरती वृक्षारोपण करा असे प्रबोधन करीत आहे. त्यांचे आजी म्हणजे आईची आईचे एक वर्षापूर्वी यमुनाबाई संपतराव देशमुख यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांची रक्षा व अस्थी हे प्रवरा नदीला पाणी असतानाही नदीत विसर्जित न करता ती रक्षा घरी घेऊन जाऊन त्यावर वृक्षारोपण करावे असा मानस ह भ प दिपक महाराज देशमुख यांनी व्यक्त केला त्यास जेष्ठ शेतकरी नेते दशरथराव सावंत, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार एस पी देशमुख सर , शेतकरी संघटनेचे नेते शरद देशमुख अगस्ति कारखान्याचे संचालक प्रकाशराव मालुंजकर तसेच त्यांचे मामा अगस्ती पतसंस्था चे वसुली अधिकारी बाबासाहेब देशमुख यांनी सहमती दिली व त्याप्रमाणे या आईच्या स्मरणार्थ तीन आंब्याची एक कडुलिंबाचे आपल्या अंगणात व स्मशानभूमीत वडाचे झाड लावण्यात आले. या आजींना आयुष्यभर आपल्या अंगणातील कडुलिंबाच्या झाडाखाली बसण्याची सवय होती काही कारणास्तव तिथलं जुनं झाड तोडावं लागलं होत तेव्हापासून त्यांची सारखी तळमळ होती की एक लिंबाचे झाड अंगणात लावा म्हणून त्यांची ती इच्छा वृक्षारोपणाने पूर्ण केली त्या झाडाला ट्री गार्ड लावून वर्षभर त्याला पाणी घालण्याची व्यवस्था करण्यात आली म्हणून आज ते झाड डौलात उभे आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक वर्ष झालेनंतर आज वर्षश्राद्धाचा कार्यक्रम गर्दी न करता पार पडला पाहिजे असे ठरले म्हणून या आजींच्या सुनबाई व जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात राजुर येथे कार्यरत असलेल्या पर्यवेक्षिका सौ. प्रतिभा देशमुख यांनी आईच्या स्मृती प्रित्यर्थ लावलेले वृक्षाची पूजा करून वर्षश्राद्ध साजरे करावे ही संकल्पना मांडली व ती अंमलात आणली मुलगा, मुलगी, नातू व सुना यांच्या हस्ते वृक्ष पूजा करून अनोख्या पद्धतीने व शासन आदेशाची पालन करत जलप्रदूषण रोखण्यासाठी व पर्यावरण रक्षणाचा एक नवा आदर्श निर्माण केला. त्याबद्दल त्यांचे सर्व नातेवाईक व सामाजिक क्षेत्रातून कौतुक होत आहे. बाबासाहेब देशमुख यांनी आईच्या दर्शनाशिवाय आपल्या या कामाला सुरुवात केली नाही आज एक वर्ष आई नंतर अंगणातल्या आईरुपी झाडाला पाणी घालून त्याचं दर्शन घेऊन त्यांनी आपल्या आईच्या स्मृति जागवत आहे.
Website Title: coronavirus mother Shraddh