Home अहमदनगर अहमदनगर: मुख्याध्यापिका लाचेच्या जाळ्यात

अहमदनगर: मुख्याध्यापिका लाचेच्या जाळ्यात

Breaking News | Ahmednagar: एका शाळेच्या मुख्याध्यापिकेला ४५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना.

Headmistress in bribery trap

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेला ४५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना समोर आली आहे.  बुधवारी दुपारी चारच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

शहरातील बोरावके कॉलेजमागील परिसरातील सुभद्राबाई गायकवाड शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता नंदलाल पवार (वय ५३) यांनी तक्रारदाराला वेतनश्रेणीच्या फरकाचे १ लाख ६३ हजार माझ्याच प्रयत्नाने मंजूर झाले असे म्हणत त्या बदल्यात ५० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज (दि. १२) रोजी लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सदर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

Web Title: Headmistress in bribery trap

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here