Home Accident News Accident: दुधाचा टॅंकर पलटी होऊन अपघात हजारो लिटर दूध वाया

Accident: दुधाचा टॅंकर पलटी होऊन अपघात हजारो लिटर दूध वाया

Milk tanker Accident in Rahuri 

राहुरी:  l Accident:  राहुरी तालुक्यातील आरडगाव-मानोरी शिव रस्त्यावर दुधाचा टॅंकर पलटी होऊन अपघात झाला आहे. या अपघातात हजारो लिटर दूध वाया गेले तर टॅंकर चालक किरकोळ जखमी झाला आहे.

आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दुधाने भरलेला टॅंकर ( क्रमांक एम.एच १६ ए.ई. ५४२५) दुध संकलन केंद्रातून भरून ब्राम्हणी येथील दुध डेरीकडे भरधाव वेगाने चालला असताना आरडगाव येथील साळुंके वस्ती शेजारी पलटी झाला आहे.त्यामुळे टॅंकर चालक जखमी झाला असुन त्यास उपचारासाठी रूग्णालयात हलविण्याच्या आले आहे. या अपघातात हजारो लिटरच्या दुधाची नासाडी झाली आहे.

Web Title: Milk tanker Accident in Rahuri 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here