Home संगमनेर अस्थीविसर्जनाऐवजी वृक्षारोपण-झोळे येथील उनवणे कुटुंबाचा अनुकरणीय उपक्रम

अस्थीविसर्जनाऐवजी वृक्षारोपण-झोळे येथील उनवणे कुटुंबाचा अनुकरणीय उपक्रम

अस्थीविसर्जनाऐवजी वृक्षारोपण-झोळे येथील उनवणे कुटुंबाचा अनुकरणीय उपक्रम

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील झोळे गावातील मुकुंद कोंडाजी उनवणे यांच्या मातोश्री कै. पार्वताबाई कोंडाजी उनवणे (वय वर्ष ६०)यांचे दिनांक १७/०७/२०१८ रोजी दुःखद निधन झाले असून त्याच्या स्मरणार्थ उनवणे कुटुंबाने अस्थीविसर्जन न करता त्याच अस्थिचे(राख) आपल्या आईची आठवण म्हणून आईच्या स्मरणार्थ  आपल्या शेतात उनवणे कुटुंबाने व झोळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दोन वृक्ष लावून कोंडाजी उनवणे यांच्या मुलांनी समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे .
Fashion Ad
झोळे गावातील व परिसरातील सर्व ग्रामस्थांनी यापुढे उनवणे कुटुंबाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून असाच उपक्रम झोळे गावात राबवावा असे मत माजी उपसरपंच किरण नवले यांनी व्यक्त केले.
या वेळी मुकुंद कोंडाजी उनवणे(मुलगा),सौ. अनिता मुकुंद उनवणे(सून),गं. भा. कामिना अशोक थोरात(मुलगी),दादा शंकर उनवणे(दिर),सौ. इंदूबाई दादा उनवणे,आकाश मुकुंद उनवणे,माजी सरपंच किरण भागाजी नवले,मिलिंद दादा उनवणे,विलास बबन वाळे,ज्ञानदेव मुरलीधर शिंदे,दीपक साहेबराव उनवणे,बाळासाहेब शिवाजी खर्डे,भाचे सुभाष तात्याबा बागुल आदींसह झोळे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here