Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: बंधाऱ्यात उडी घेत महिलेची आत्महत्या

अहमदनगर ब्रेकिंग: बंधाऱ्यात उडी घेत महिलेची आत्महत्या

Breaking News | Ahmednagar: प्रवरा नदीपात्राच्या बंधाऱ्यावरून उडी घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Suicide of a woman in the dam

श्रीरामपूर : चांदेगाव (ता. राहुरी) येथील विवाहितेने श्रीरामपूर तालुक्यातील वळदगावमधील प्रवरा नदीपात्राच्या बंधाऱ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण मात्र समजू शकले नाही. मयताचे नाव छाया अतुल कणसे असे आहे. तिच्या विवाहास दहा वर्षे झाले आहेत.

बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत कुटुंबीयांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतलेला नव्हता. पोलिसांनी फिर्याद दाखल करून घ्यावी त्यानंतरच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी कुटुंबीयांची भूमिका होती. मृतदेह शहर पोलिसांच्याच ताब्यात होता.

बुधवारी सकाळी ही घटना घडली. त्यानंतर श्रीरामपूर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत होता. महिलेचे माहेरचे कुटुंबीय शहर पोलिस ठाण्यात पोहोचले होते.

Web Title: Suicide of a woman in the dam

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here