Home महाराष्ट्र Drowned: कालव्यात बुडून काका- पुतण्याचा मृत्यू

Drowned: कालव्यात बुडून काका- पुतण्याचा मृत्यू

Uncle-nephew drowned in canal

भंडारा | Bhandara : जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेल्यानंतर कालव्यात उतरून हातपाय धुणे काका पुतण्याच्या जीवावर बेतले आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील आसलपानी येथील कारली लघुकालव्यात दोघांचा बुडून  (drowned ) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. साहील राजेश कोकोडे (वय १२) आणि हौसीलाल हिरदेराम कोकोडे (वय २४) दोघेही (रा. आसलपानी ता. तुमसर) अशी बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, साहील व हौसीलाल जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेले होते. घराकडे परतत असताना वाढत्या तापमानामुळे दोघेही घामाने भिजले होते. हातपाय धुण्यासाठी दोघेही कारली लघुकालव्यात उतरले. त्यावेळी त्यांचा तोल जाऊन दोघेही पाण्यात पडले.तेथे वाचवण्यासाठी त्यांनी हाका मारल्या मात्र कुणीही नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

साहील हा येरली येथील आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकत होता. तो आश्रमशाळेत जाणार होता. त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडल्याने आसलपानी गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Uncle-nephew drowned in canal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here