Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन दोघांवर अनैसर्गिक अत्याचार

अहमदनगर: अल्पवयीन दोघांवर अनैसर्गिक अत्याचार

Ahmednagar Crime: दोघा मुला मुलींवर अनैसर्गिक अत्याचार (abuse) केल्याची घटना.

Unnatural abuse of two minors

अहमदनगर: तुमचा क्लास घेतो, असे सांगून एकाने अल्पवयीन दोघा मुला मुलींवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आईने दिलेल्या फिर्यादीवरून एकावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघे बहीण-भाऊ शेजारच्या मुलासोबत खेळण्यासाठी जात असत. एकेदिवशी शेजारचा मुलगा बहीण भावाला बोलाविण्यासाठी घरी आला होता, पण मुले त्याच्यासोबत खेळायला गेली नाहीत. म्हणून आईने विचारले असता त्यांनी हा प्रकार आईला सांगितला.

शेजारच्या मुलाने तुमचा क्लास घेतो, असे सांगून दोघा अल्पवयीन बहीण-भावाला बेडरूममध्ये नेले व त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी असे कृत्य केले. शेजारच्या मुलाने अनैसर्गिक कृत्य केल्याचे समजताच आईने तोफखाना पोलीस ठाणे गाठले व मुलाविरोधात फिर्याद दिली. त्यावरून मुलाविरोधात भादंवि कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Unnatural abuse of two minors

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here