Home अहमदनगर भावजयीवर वाईट नजर ठेवतोस असे म्हणत एकावर चाकूने वार

भावजयीवर वाईट नजर ठेवतोस असे म्हणत एकावर चाकूने वार

Crime News bad eye on Bhavjay

श्रीरामपूर | Crime News: श्रीरामपूर तालुक्यातील वाकडी या गावात भावजयीवर वाकडी नजर ठेवतोस म्हणून एकावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे.

आकाश रामनाथ जगधने हा किराणा सामान घेऊन घराकडे जात असताना राहुल संपत जगधने हा आकाशला म्हणाला की, तु जास्त माजला आहेस. तु माझ्या भावजयीवर वाईट नजर ठेवतोस, तुला जिवंत ठेवणार नाही असे बोलून राहुल जगधने याने आकाशच्या डाव्या खांद्यावर वार केले. त्याचबरोबर आकाशच्या मानेवर देखील चाकूने वार केले व म्हणाला की तुझ्या घरच्यांना देखील असेच संपवून टाकेन. आकाशला नाशिक येथे  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रीरामपूर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमीचा जबाब नोंदवून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे हे करीत आहे.  

Web Title: Crime News bad eye on Bhavjay

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here