Home अहमदनगर अहमदनगर: मुलीला फुस लावून पळवून नेले

अहमदनगर: मुलीला फुस लावून पळवून नेले

Breaking News | Ahmednagar: १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना.

girl was seduced and abducted

अहमदनगर: नगर शहरासह जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटना वाढतच असून अशीच आणखी एक घटना भिंगार शहरात घडली आहे. घरी एकटीच असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना भिंगार च्या विजय लाईन चौक परिसरात बुधवारी (दि.१९) सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सदर अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी बुधवारी रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे खाजगी नोकरी करतात. ते सकाळी ८.३० च्या सुमारास कामावर गेले. त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यही कामानिमित्त बाहेर गेलेले होते. त्या वेळी त्यांची १७ वर्षीय मुलगी एकटीच घरी होती. सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या कालावधीत अज्ञात व्यक्तीने तिला कशाची तरी फूस लावून पळवून नेले. दुपारी कुटुंबीय घरी आल्यावर त्यांना मुलगी घरात दिसून आली नाही, त्यांनी तिचा आजूबाजूला शोध घेतला. तिच्या मैत्रिणकडे विचारणा केली असता काहीही माहिती भेटली नसुन ती कोठेही मिळुन आली नाही. त्यामुळे आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतुन पळवून नेले आहे असे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भा.दं. वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: girl was seduced and abducted

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here