Home अहमदनगर अहमदनगर : हॉटेलवर छापा, तीन महिलांची सुटका

अहमदनगर : हॉटेलवर छापा, तीन महिलांची सुटका

Breaking News | Ahmednagar: श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रीम येथे छापा टाकत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने तीन पीडितांची सुटका.

Hotel raid, three women freed

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रीम येथे छापा टाकत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने तीन पीडितांची सुटका केली. याप्रकरणी किरण रावसाहेब जरे (वय ३९, रा. वारुळाचा मारुती, रा. नालेगाव, सावेडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथे सुप्रीम हॉटेलमध्ये वेश्या व्यावसाय सुरू आहे, अशी खात्रीशीर माहिती अनैतिक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानुसार या विभागाच्या पथकाने

रविवारी पहाटे हॉटेल सुप्रीम येथे छापा टाकला असता आरोपी वेश्या व्यावसायासाठी महिला उपलब्ध करून कुंटणखाना चालविताना मिळून आला. त्याला ताब्यात घेण्यात आले असून, तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील समीर सय्यद, ए. आर. काळे, छाया रांधवन, काळे आदींच्या पथकाने केली.

Web Title: Hotel raid, three women freed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here