Home नाशिक गोणीत सापडले मानवी सांगाडे

गोणीत सापडले मानवी सांगाडे

Breaking News | Nashik:  एका मंदिराजवळ गोणीत पाच ते सहा मानवी कवट्या आणि हाडे आढळून आल्याने खळबळ.

Human skeletons found in sacks

पंचवटी: पेठरोडवरील एरंडवाडी परिसरात एका मंदिराजवळ गोणीत पाच ते सहा मानवी कवट्या आणि हाडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

सदर मानवी कवट्या असलेली गोणी पोलिसांनी ताब्यात घेतली असून मंदिराजवळ गोणीत आढळलेल्या मानवी कवट्या कोणी आणल्या, कुठून आणल्या, तर कशासाठी आणल्या याबाबत पंचवटीत दिवसभर उलट सुलट चर्चा सुरू होती. तर कोणीतरी अघोरी विद्या करण्यासाठी हे आणले असावे असा संशय व्यक्त केला जात असून, भरवस्तीत आढळलेल्या मानवी कवट्यांमुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. तर याबाबत आढळलेल्या मानवी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गोणीत मानवी हाडे आणि कवट्या खर्‍या नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र या मागचा सूत्रधार व त्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

पोलिसांनी हे सर्व ताब्यात घेत मंदिराच्या पुजाऱ्याला व इतर नागरिकांना तपासासाठी बोलावून घेत अधिक माहिती घेतली असता ही मानवी हाडे व कवट्या प्लास्टिकच्या असल्याचे समजते. मात्र मंदिराजवळ हे सर्व गोणीत कोणी ठेवले किंवा कोणी आणल्या याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

मात्र परिसरातील नागरिकांकडे चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.  नेमकी अघोरी प्रकार आहे का आणखी काही हे आता तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमका काय प्रकार होता, हे कळू शकेल. अधिक तपास पंचवटी पोलीस करत आहे.

Web Title: Human skeletons found in sacks

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here