Home राष्ट्रीय Ram Vilas Paswan: केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

Ram Vilas Paswan: केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

Ram Vilas Paswan passed away

दिल्ली: लोकजनशक्ती पार्टीचे नेते व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे. ते लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष होते. त्यांचा पक्ष केंद्रातील मोदी सरकारमध्ये सहभागी होता.

गेली पाच दशकं राजकारणात ठसा उमटविणारे मुरब्बी राजकारणी नेते यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांचे वय ७४ वर्ष होते. दिल्लीच्या एस्कॉर्ट रुगणालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पासवान यांचे पुत्र चिराग यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. रामविलास पासवान हे नेते गेल्याने संघर्षशील नेता गमाविल्याची भावना व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. चिराग पासवान यांनी एक ट्विट करत पापा तुम्ही आता या जगात नाही मात्र जिथे असाल तिथे माझ्या सोबत असाल, असे म्हटले आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ram Vilas Paswan passed away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here