संगमनेरात चोरट्यांचा सूळसूळाट, शहरात पावभाजी दुकान फोडले
संगमनेर | Theft: संगमनेर तालुक्यात घारगाव येथे दोन ठिकाणी चोरीच्या घटना ताज्या असतानाचा संगमनेर शहरात आणखी एक दुकान फोडल्याचे समोर आले आहे. संगमनेरमध्ये भुरट्या चोरांचा सूळसूळाट सुटला आहे.
संगमनेर शहरातील पावभाजी व्हेज चायनीज दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने आत पप्रवेश करत गल्ल्यातील चार ते पाच हजार रुपये चोरून नेल्याचे दुकान मालक अरविंद क्षत्रिय यांनी सांगितले आहे. शुक्रवारी पहाटे चार ते साडे चार वाजेच्या सुमारास शहरातील नवीन नगर रोड रस्त्यावरील प्रशांत पावभाजी चायनीज या दुकानात चोरट्यांनी शटर तोडून चोरी केली आहे.
याप्रकरणी अरविंद क्षत्रिय यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस अधिक तपास करीत आहे.
Web Title: Sangamner City theft in Shop